Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर... (2024)

Table of Contents
मुरलीधर मोहोळ यांनी घेतली राज ठाकरेंची भेट नेट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर होणार- NTA अटल सेतूला कोणताही धोका नाही- फडणवीस Delhi Water Crisis Live : दिल्लीच्यामंत्री आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू OBC Reservation Live : ओबीसींचे शिष्टमंडळ अन् सरकारमध्येसह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू Jalna Live : जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून STवर दगडफेक Koregaon Bhima Live : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी महेश राऊतला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा Indian Hockey team sponsorship : भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्वओडिशाने 2036 पर्यंत वाढवले Manoj Jarange Patil Live:आंदोलन शांतपणे करणे म्हणजे जातीवाद आके आहे का?मनोज जरांगे यांचा प्रश्न UGC-NET Paper Leak Live: परीक्षेच्या एक दिवस अगोदर UGC-NET चा पेपर फुटला, डार्कनेटवर अपलोड करण्यात आला, CBI चा खुलासा Karnataka Live:NEET आणि UGC-NET च्या मुद्द्यांवरकाँग्रेसनेबेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये व्यक्त केला निषेध Patna Live: विजय सिन्हा यांनी पाटणा येथील खाण आणि भूविज्ञान विभागातील कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले International Yoga Day Live: भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केला योगाभ्यास Election Commission Live: लोकसभेनंतर आताराज्यात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता Maharashtra Politics Live:भाजपकडून नाशिकच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती International Yoga Day 2024 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगसाधना केल्यानंतर उपस्थितांसोबत घेतला सेल्फी Manoj Jarange live : मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीकडं जाणार नाहीत, पोलिसांच्या विनंतीमुळे निर्णय Laxman Hake OBC Andolan live : सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंची घेणारभेट NCP Sharad Pawar Group MeetingLive : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक International Yoga Day 2024 Live :मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांची मंत्रालयात योगसाधना International Yoga Day 2024 Live : भारताची संस्कृती, अध्यात्म आणि योग संपूर्ण जगाला जोडत आहे - ओम बिर्ला Minister Atishi Live : दिल्ली पाण्याप्रश्नी मंत्री अतिशी यांचं आजपासूनआमरण उपोषण International Yoga Day Live: योग दिवस जगभरात साजरा होतोय, याचा मला आनंद आहे -अमृता फडणवीस Weather Update Live: येत्या 48 तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज Tilari Ghat Live: तिलारी घाट ऑक्टोबरअखेर अवजड वाहतुकीसाठी बंद PM मोदींनी 124 देशांतील नागरिकांनादररोज योगासनं करण्यास प्रोत्साहित केलं -एचडी कुमारस्वामी Yogi AdityanathLive : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये केलायोगा International Yoga Day Live :जगातील अनेक देशांमध्ये योग हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग- PM मोदी International Yoga Day Live:परदेशातील 10 मोठ्या संस्थांनीही योगास मान्यता दिली- PM मोदी International Yoga Day Live:भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मथुरामध्ये केलीयोगासने International Yoga Day Live:ITBP च्या जवानांनी उत्तर सिक्कीममधील मुगुथांग सब सेक्टर येथे 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर केली योगासने International Yoga Day Live Update:आरोग्यासाठी योग्य विज्ञान आणि प्राणायाम,मी रोज एक तास प्रणायम व्यायाम करतो-नितीन गडकरी 10th International Yoga Day Live Update:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनीआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केलायोगा International Yoga Day Live Update:केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि बीएल वर्मा यांनीकेलायोगा Yoga Day 2024 Live:भारतीय लष्कराचे जवान लेह, लडाख येथील कर्नल सोनम वांगचुक स्टेडियममध्ये योगासने करण्यासाठी सज्ज PM Modi Live:पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर मधील दल सरोवराच्या काठावर करणार योगा International Yoga Day Live Update: हरिद्वारच्या पंतजली विद्यापीठात योगगुरू रामदेव बाबांची योगासने सुरू International Yoga Day 2024 Live Update: आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमधील एका महत्वपूर्ण कार्यक्रमात ते सहभागी होतील. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर Related Stories References

देश

Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर... (1)

Latest Marathi News Live UpdateEsakal

मुरलीधर मोहोळ यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात त्यांची सदिच्छा भेट घेतली.

नेट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर जाहीर होणार- NTA

NTA ने जून 2024 ची संयुक्त CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली असून परीक्षेचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाइटद्वारे घोषित केले जाईल, असं एनटीएने शुक्रवारी सांगितलं.

अटल सेतूला कोणताही धोका नाही- फडणवीस

अटल सेतूला भेगा पडल्या नसून महामार्गाला कोणताही धोका नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Delhi Water Crisis Live : दिल्लीच्यामंत्री आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू

दिल्ली: दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांनी राष्ट्रीय राजधानीतील जलसंकटावर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हरियाणा सरकार दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडत नसल्याचा आरोप 'आप'ने केला आहे.

#WATCH | Delhi: Indefinite hunger strike underway by Delhi Water Minister Atishi

She has started an indefinite hunger strike today over the water crisis in the national capital. AAP alleges that Haryana govt is not releasing Delhi's share of water. pic.twitter.com/EanqkgfraQ

— ANI (@ANI) June 21, 2024

OBC Reservation Live : ओबीसींचे शिष्टमंडळ अन् सरकारमध्येसह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू

ओबीसींचे शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये आज बैठक होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. या बैठकीत चर्चेनंतर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Jalna Live : जालन्यात अज्ञात आंदोलकांकडून STवर दगडफेक

जालना जिल्ह्यात काही अज्ञात आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एसटीचं नुकसान झालं आहे.

Koregaon Bhima Live : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी महेश राऊतला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आरोपी महेश राऊतला सुप्रीम कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 26 जून ते 10 जुलै या कालावधीसाठी महेश राऊतला जामीन मंजूर करण्यात आला असून आज्जीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी करण्यात आलेल्या विनंतीवरून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. राऊत हा जून 2018 पासून अटकेत आहे. महेश राऊतला NIA ने अटक केली होती.

Indian Hockey team sponsorship : भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्वओडिशाने 2036 पर्यंत वाढवले

ओडिशाने भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व 2036 पर्यंत वाढवले आहे. ​​हॉकी इंडियासाठी ओडिशा सरकारचे प्रायोजकत्व 2036 पर्यंत वाढवले ​​आहे, मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज हॉकी इंडियाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतल्यानंतर याबद्दल माहिती दिली.

Odisha extends Indian Hockey team sponsorship till 2036

Odisha Govt’s sponsorship for Hockey India extended till 2036, says Chief Minister Mohan Charan Majhi after Hockey India delegation met him today: CMO pic.twitter.com/1HNN8vFE81

— ANI (@ANI) June 21, 2024

Manoj Jarange Patil Live:आंदोलन शांतपणे करणे म्हणजे जातीवाद आके आहे का?मनोज जरांगे यांचा प्रश्न

मनोज जरांगे काय म्हणाले?

- आंदोलन शांतपणे करणे म्हणजे जातीवाद आके आहे का?

- काहीना आता आरक्षण मिळाले तो जातीवाद नाही का ?

- कीर्तनामुळे मुलांचा अभ्यास होत नाही आणि आंदोलनामुळे ट्रॅफिक जाम होते असे लोक म्हणाले. यामुळे अंतरवाली येथील आंदोलन बंद करण्यासाठी निवेदन दिले. पण आता तुमच्यामुळे ट्राफिक जाम झाली नाही का ?

- मी आता शहागडला जात नसून इथच राहणार. मी आता तिथच कार्यालय सुरू करणार.

- येवल्या वाल्याने आंदोलन उभे केले तर जातीय तेढ निर्माण नाही झाला का ? आम्ही आंदोलन केलं तर जातीवादी तुम्ही केल्यावर नाही होत का ?

UGC-NET Paper Leak Live: परीक्षेच्या एक दिवस अगोदर UGC-NET चा पेपर फुटला, डार्कनेटवर अपलोड करण्यात आला, CBI चा खुलासा

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत घेण्यात येणारी UGC-NET परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांना गृह मंत्रालयामार्फत परीक्षेतील अनियमिततेची माहिती मिळाली होती, त्यानंतर पेपर रद्द करण्यात आला. त्याचवेळी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला मोठी माहिती मिळाली आहे. यूजीसी-नेटचा पेपर लीक झाल्याचे सीबीआयने तपासानंतर सांगितले आहे. परीक्षेपूर्वी पेपर डार्कनेटवर अपलोड करण्यात आला होता.

Karnataka Live:NEET आणि UGC-NET च्या मुद्द्यांवरकाँग्रेसनेबेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये व्यक्त केला निषेध

Karnataka: एनएसयूआय (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) आणि भारतीय युवक काँग्रेसने NEET आणि UGC-NET च्या मुद्द्यांवर बेंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये निषेध केला. नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

#WATCH | Karnataka: NSUI (National Students' Union of India) and Indian Youth Congress protested at Freedom Park in Bengaluru, over NEET and UGC-NET issues. They were later detained by the Police. pic.twitter.com/IvioWG1kVt

— ANI (@ANI) June 21, 2024

Patna Live: विजय सिन्हा यांनी पाटणा येथील खाण आणि भूविज्ञान विभागातील कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले

Patna: बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी पाटणा येथील खाण आणि भूविज्ञान विभागातील कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केले.

#WATCH | Bihar Deputy CM Vijay Sinha inaugurates the Command & Control Centre in the Mines & Geology Department in Patna pic.twitter.com/phqh1XFtoa

— ANI (@ANI) June 21, 2024

International Yoga Day Live: भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केला योगाभ्यास

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज देशभरातील भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी योगाभ्यास केला.

WATCH | Indian Army personnel performed Yoga in the higher Pir Panjal ranges along the Line of Control, today

(Video source: Indian Army) pic.twitter.com/2amkwfK6iG

— ANI (@ANI) June 21, 2024

Election Commission Live: लोकसभेनंतर आताराज्यात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. आयोगाने निवडणूक याद्या अद्ययावत करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. घरोघरी जाऊन मतदार याद्या अदययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून मतदान केंद्राच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यात विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics Live:भाजपकडून नाशिकच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून नाशिकच्या प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

International Yoga Day 2024 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगसाधना केल्यानंतर उपस्थितांसोबत घेतला सेल्फी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमध्ये योगा डे साजरा केला. श्रीनगरमध्ये योगा डे साजरा केल्यानंत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांसोबत सेल्फीही घेतला.

Manoj Jarange live : मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीकडं जाणार नाहीत, पोलिसांच्या विनंतीमुळे निर्णय

मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीकडे आज जाणार नाहीत. तर, ते थेट बीड जिल्ह्यातील चाकरवाडीकडे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कायदा सुव्यवस्थामुळे आणि पोलिसांनी विनंती केल्यामुळे अंतरवाली सराटीकडे येणे त्यांनी रद्द केले आहे.

Laxman Hake OBC Andolan live : सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंची घेणारभेट

ओबीसी वर्गाच्या मूळ आरक्षणात मराठ्यांचा समावेश नको, यासह इतर मागण्यांसाठी लक्ष्मण हाके गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेत. आज सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंना भेटण्यासाठी उपोषणस्थळी येणार आहे. सकाळी मंत्री उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर हे शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेऊन त्यांनी उपोषण सोडावं म्हणून विनंती करणार आहेत.

NCP Sharad Pawar Group MeetingLive : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक होणार आहे. आज दुपारी 3 वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक पार पडणार असल्याची माहिती आहे. यावेळी नवनिर्वाचित खासदारांना शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

International Yoga Day 2024 Live :मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीसांची मंत्रालयात योगसाधना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने मंत्रालयात योगा दिन साजरा करण्यात आला.

International Yoga Day 2024 Live : भारताची संस्कृती, अध्यात्म आणि योग संपूर्ण जगाला जोडत आहे - ओम बिर्ला

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बोलताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, 'भारताची संस्कृती, अध्यात्म आणि योग संपूर्ण जगाला जोडत आहे. योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे अंतर्गत ऊर्जा निर्माण होते. हे आपले सर्व ताणतणाव देखील दूर करते. त्यामुळेच आज संपूर्ण जग योगाचा स्वीकार करत आहे.'

Minister Atishi Live : दिल्ली पाण्याप्रश्नी मंत्री अतिशी यांचं आजपासूनआमरण उपोषण

नवी दिल्ली : दिल्ली पाण्याप्रश्नी मंत्री अतिशी आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. 2 दिवसांपूर्वी अतिशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीचा पाणीप्रश्न सोडवला नाही, तर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. आज सकाळी 10 वाजता राजघाटला जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहून उपोषणाची त्या सुरुवात करणार आहे. एकीकडे अतिशी यांचं उपोषण सुरू होणार असून दुसरीकडे केजरीवाल आज जेलच्या बाहेर येणार आहेत.

International Yoga Day Live: योग दिवस जगभरात साजरा होतोय, याचा मला आनंद आहे -अमृता फडणवीस

आज आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतोय. हा योग दिवस जगभरात साजरा होतोय, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली. त्या म्हणाल्या, दैनंदिन जीवनात योगा अत्यंत गरजेचा आहे. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीये, त्यांची मुलं या ठिकाणी आहेत. या सर्व मुलांसाठी अनेक सत्र ठेवण्यात आली आहेत. त्यांना मानसिकरित्या सदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Weather Update Live: येत्या 48 तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा एकदा मौसमी पाऊस सक्रिय झाला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात येत्या ३-४ तासांत जोरदार पाऊस होऊ शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. इथे क्लिक करा

Tilari Ghat Live: तिलारी घाट ऑक्टोबरअखेर अवजड वाहतुकीसाठी बंद

कोल्हापूर : पावसाळ्यात अतिवृष्टी होऊन घाटातील रस्त्याच्या दोन्‍ही बाजूंचे संरक्षक कठडे कोसळून अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून तिलारी घाटातील अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरअखेर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी काढले आहेत. दरम्यान, या मार्गाला पर्याय म्हणून आंबोली व बेळगाव जिल्ह्यातील चोर्ला घाटाचा (Amboli Chorla Ghat) पर्यायी म्हणून वापर करता येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. इथे क्लिक करा

PM मोदींनी 124 देशांतील नागरिकांनादररोज योगासनं करण्यास प्रोत्साहित केलं -एचडी कुमारस्वामी

केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणतात, "पंतप्रधान मोदींनी जवळपास 124 देशांतील नागरिकांना दररोज योगासने करण्यास आणि चांगले आरोग्य राखण्यासाठी प्रोत्साहित केलंय, यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो."

#WATCH | Union Minister HD Kumaraswamy says, " PM Modi encouraged citizens of nearly 124 countries to do Yoga everyday and keep good health...I congratulate him" https://t.co/93l9Nsyn7m pic.twitter.com/SlQxTuLO72

— ANI (@ANI) June 21, 2024

Yogi AdityanathLive : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये केलायोगा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लखनौ येथील राजभवन प्रांगणात आयोजित सामूहिक योग व्यायाम कार्यक्रमात भाग घेतला.

International Yoga Day Live :जगातील अनेक देशांमध्ये योग हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग- PM मोदी

जगातील अनेक देशांमध्ये योग हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनत चालला आहे. 2015 मध्ये तुर्कमेनिस्तानमध्ये योग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथील वैद्यकीय विद्यापीठात योगाचा समावेश करण्यात आला आहे. सौदी अरेबियाने आपल्या शिक्षण केंद्रात योगाचा समावेश केला आहे. मंगोलियामध्ये अनेक योग शाळा चालवल्या जात आहेत. तुम्हाला माहिती असेलच की भारतात यावर्षी फ्रान्समधील 101 वर्षीय महिला योग शिक्षिकेला पद्मश्री देण्यात आली आहे. ती कधीच भारतात आली नाही, पण आपले जीवन योगाला समर्पित केले.

#WATCH | Srinagar, J&K: On International Day of Yoga, PM Narendra Modi says, "This year in India, a 101-year-old woman Yoga teacher from France was accorded the Padma Shri. She had never come to India but she dedicated her entire life to creating awareness about Yoga. Today,… pic.twitter.com/t0BYVB7V8R

— ANI (@ANI) June 21, 2024

International Yoga Day Live:परदेशातील 10 मोठ्या संस्थांनीही योगास मान्यता दिली- PM मोदी

2015 मध्ये 35 हजार लोकांनी कर्तव्याच्या मार्गावर एकत्र योग केला. हा एक आंतरराष्ट्रीय विक्रम ठरला. गेल्या वर्षी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 130 देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र योगासने केली होती. परदेशातील 10 मोठ्या संस्थांनीही योगास मान्यता दिली आहे. जगभरात योगा करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

International Yoga Day Live:भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मथुरामध्ये केलीयोगासने

उत्तर प्रदेश: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मथुरामध्ये योगासने केली.

#WATCH | Uttar Pradesh: BJP MP Hema Malini performs Yoga in Mathura, on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/ENffFEulyE

— ANI (@ANI) June 21, 2024

International Yoga Day Live:ITBP च्या जवानांनी उत्तर सिक्कीममधील मुगुथांग सब सेक्टर येथे 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर केली योगासने

10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ITBP चे जवान उत्तर सिक्कीममधील मुगुथांग सब सेक्टर येथे 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर योगासने केली.

#WATCH | ITBP personnel perform Yoga at Muguthang Sub Sector in North Sikkim at an altitude of more than 15,000 feet, on the 10th International Yoga Day.#InternationalYogaDay2024

(Source: ITBP) pic.twitter.com/oBY9Xuznb8

— ANI (@ANI) June 21, 2024

International Yoga Day Live Update:आरोग्यासाठी योग्य विज्ञान आणि प्राणायाम,मी रोज एक तास प्रणायम व्यायाम करतो-नितीन गडकरी

शरीरासाठी योग महत्वाचा आहे, वयक्तिक जीवनात आणि राजकीय जीवनात रोज याच किती अनुकरण करतो, पण मी रोज एक तास प्रणायम व्यायाम करतो. आरोग्यासाठी योग्य विज्ञान आणि प्राणायाम महत्त्वाचा आहे. महापालिका प्रशासन या कार्यक्रमाचे आयोजन करते यासाठी मी अभिनंदन करतो.विदेशात फार मोठया योग्य शिक्षकांची गरज आहे. विदेशात अनेक भारतीय लोक योग शिकवतात, त्यामुळे रोजगाराचे साधन निर्माण होऊ शकते, नियमित योगासने केल्यास औषधांची गरज पडणार नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

10th International Yoga Day Live Update:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांनीआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केलायोगा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा केला.

#WATCH | Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath and Governor Anandi Ben Patel perform yoga on the 10th International Yoga Day.#InternationalYogaDay2024 pic.twitter.com/zT3a7bs0vb

— ANI (@ANI) June 21, 2024

International Yoga Day Live Update:केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि बीएल वर्मा यांनीकेलायोगा

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि बीएल वर्मा यांनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा केला.

Delhi: Union Ministers Pralhad Joshi and BL Verma perform yoga on the 10th International Yoga Day.#InternationalYogaDay2024 pic.twitter.com/yAC7wbuIuM

— ANI (@ANI) June 21, 2024

Yoga Day 2024 Live:भारतीय लष्कराचे जवान लेह, लडाख येथील कर्नल सोनम वांगचुक स्टेडियममध्ये योगासने करण्यासाठी सज्ज

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय लष्कराचे जवान लेह, लडाख येथील कर्नल सोनम वांगचुक स्टेडियममध्ये योगासने करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

#WATCH | Indian Army jawans all set to perform Yoga at Col Sonam Wangchuk Stadium in Leh, Ladakh on the occasion of International Day of Yoga. pic.twitter.com/cm2qcTYQVf

— ANI (@ANI) June 21, 2024

PM Modi Live:पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर मधील दल सरोवराच्या काठावर करणार योगा

आज आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. देशभरात मोठ्या उत्साहात योग दिवस साजरा होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर मधील दल सरोवराच्या काठावर योगा करणार आहेत.जवळपास 7 हजार लोक नरेंद्र मोदी यांच्यासोबत योगासने करणार आहेत. 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला तेव्हापासून वेगवेगळ्या थीमवर तो साजरा केला जातोय. यावर्षीची योग दिनाची थीम ‘योगा फॉर सेल्फ एंड सोसायटी' ही आहे

International Yoga Day Live Update: हरिद्वारच्या पंतजली विद्यापीठात योगगुरू रामदेव बाबांची योगासने सुरू

आज १० वा आतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या निमित्ताने हरिद्वारच्या पंतजली विद्यापीठात योगगुरू रामदेव बाबांची योगासने सुरू आहेत. विविध ठिकाणी योगासानांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

International Yoga Day 2024 Live Update: आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी पीएम मोदी काश्मीरमध्ये

आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये एका भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी श्रीनगरमध्ये दाखल झालेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. यादरम्यान पीएम मोदी विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनानिमित्त जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमधील एका महत्वपूर्ण कार्यक्रमात ते सहभागी होतील. देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket

Narendra Modi

Jammu And Kashmir

crime

Weather

yoga

Health Department

Yoga Lifestyle

Yoga Day

world yoga day

health

Related Stories

No stories found.

Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर... (2024)

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Stevie Stamm

Last Updated:

Views: 5803

Rating: 5 / 5 (80 voted)

Reviews: 95% of readers found this page helpful

Author information

Name: Stevie Stamm

Birthday: 1996-06-22

Address: Apt. 419 4200 Sipes Estate, East Delmerview, WY 05617

Phone: +342332224300

Job: Future Advertising Analyst

Hobby: Leather crafting, Puzzles, Leather crafting, scrapbook, Urban exploration, Cabaret, Skateboarding

Introduction: My name is Stevie Stamm, I am a colorful, sparkling, splendid, vast, open, hilarious, tender person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.